Posts

गाथा महादेवाची

Image
आरती महादेवाची :- लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा। वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।। लावण्यसुंदर मस्तकीं बाळा। तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।१।। जय देव जय देव जय श्रीशंकरा।। आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।। कर्पुगौरा भोळा नयनीं विशाळा। आर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा। विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा। ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय. ।।२।। देवी दैत्यीं सागरमंथन पैं केलें। त्यामाजी जें अवचित हळाहळ उठिलें। तें त्वां असुरपषं प्राशन केलें। नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें।। जय. ।।३।। व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी। पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी। शतकोटीचें बीज वाचे उच्चारी। रघुकुलतिलक रामदासा अंतरी।। जय देव जय देव जय श्रीशंकरा।।४।। भगवान शिव हे सर्व सृष्टीचे कारण आहेत. रुद्र हे शिव शंकराचे वेदांतील नाव आहे. पार्वती त्यांची अर्धांगिनी (शक्ती) आहे. आणि स्कंद आणि गणेशही त्यांची मुले आहेत. भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली व भगवान विष्णू हे ह्या सृष्टीचे पालन करतात. परंतु सृष्टीचे कल्याण हे भगवान शिव शंकरामुळेच होणार आहे.  देशभरातील प्रत्येक प्रांतात शिवशकंराची आराधना केली जाते. '