गाथा महादेवाची

आरती महादेवाची :-

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।

वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।।

लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।

तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।१।।




जय देव जय देव जय श्रीशंकरा।।

आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।।

कर्पुगौरा भोळा नयनीं विशाळा।

आर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा।

विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय. ।।२।।


देवी दैत्यीं सागरमंथन पैं केलें।

त्यामाजी जें अवचित हळाहळ उठिलें।

तें त्वां असुरपषं प्राशन केलें।

नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें।। जय. ।।३।।


व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी।

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी।

शतकोटीचें बीज वाचे उच्चारी।

रघुकुलतिलक रामदासा अंतरी।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा।।४।।


भगवान शिव हे सर्व सृष्टीचे कारण आहेत. रुद्र हे शिव शंकराचे वेदांतील नाव आहे. पार्वती त्यांची अर्धांगिनी (शक्ती) आहे. आणि स्कंद आणि गणेशही त्यांची मुले आहेत. भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली व भगवान विष्णू हे ह्या सृष्टीचे पालन करतात. परंतु सृष्टीचे कल्याण हे भगवान शिव शंकरामुळेच होणार आहे.



 देशभरातील प्रत्येक प्रांतात शिवशकंराची आराधना केली जाते. 'हर हर महादेव...', अशा जयघोषात शिवाचे भाविक तल्लीन होऊन जातात.

शिवशंकराला देवांचा देव महादेव मानतात. महादेवाचे मंदिर नाही, असे गाव भारतात शोधून देखील सापडणार नाही.  सदाशिव, सांब, महेश, मंगेश, गिरिजापती, पार्वतीपती, भूतनाथ, नीलकंठ, चंद्रमौली, आशुतोष व महादेव असे नामस्मरण करून भाविक चराचरात सामावलेल्या शिवशंकराचा धावा करीत असतात.

भगवान शिव यांची अनेक नावे आणि विविध रूपे प्रसिद्ध आहेत. सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून त्यांना "महादेव" असे संबोधले जाते. समुद्रमंथातून निर्माण झालेले विष प्राशन करून ते आपल्या कंठात साठविल्यामुळे त्यांचा गळा निळ्या रंगाचा झाला, आणि म्हणूनच त्यांना "नीलकंठ" किंवा "नीलग्रिव" म्हटले जाऊ लागले. समस्त प्राणिमात्रा व पशूंचे स्वामी असल्याने ते "पशुपती" म्हणून देखील ओळखले जातात. भगवान शंकर हेही या देवतेच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे. शिव हे या जगताचे आदियोगी, प्रथम योगी, आदि गुरू, प्रथम गुरू आहेत अशी मान्यता आहे. शं करोती इति शंङ्कर: (संस्कृत शंङ्कर) | म्हणजे जो आपले कल्याण करतो तो शंकर होय.

भगवान शंकर यांना त्रिदेवांमध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे. भगवान ब्रह्मा निर्माता, भगवान विष्णू सं-रक्षक आणि भगवान शिव हे अवि’नाश आहेत. एकत्रितपणे, त्रिदेव हे निसर्गाच्या नियमांना सूचित करतात की जे घडले आहे, ते न’ष्ट होईल याची खात्री आहे.


या त्रिमूर्तीची उत्पत्ती स्वतःच एक रह’स्य आहे. अनेक पुराणांचा असा विश्वास आहे की भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू हे शिवातून उत्पन्न झाले आहेत. पण, भाविकांच्या मनात असा प्रश्न पडतो की भगवान शिव यांचा ज’न्म कसा झाला?


असे म्हणतात की भगवान शिव स्व’यंभू आहेत म्हणजेच ते मानवी श-रीरापासून ज-न्मलेले नाहीत. जेव्हा काहीही नव्हते तेव्हा भगवान शिव तेथे होते आणि सर्वकाही न’ष्ट झाल्यानंतरही ते अस्तित्वात असतील. भगवान शिव यांना हिंदू पौ-राणिक कथांमधील सर्वात प्राचीन देवता असे म्हटले जाते.

शिव हे दैवत मंगलमय, कल्याण करणारे असून त्यांच्यावर भाविकांची अपार श्रध्दा आहे. शिवकृपेने जीवनात कोणत्याच प्रकारचे दुःख येत नाही, अशी श्रद्धा आहे.

महादेवानेही काळानुसार अनेक अवतार घेतले. त्यांच्या काही अवतारांना कालभैरव तर काही अवतारांना बीजपत्र असे म्हणतात. पुराणानुसार भगवान शंकराचे एकूण 19 अवतार झाले आहेत.

1)ऋषी दुर्वासा: ऋषी दुर्वासा हे भगवान शिवाच्या पहिल्या अवतारांपैकी एक मानले जातात. दुर्वासा ऋषी आपल्या रागावरून जगभर प्रसिद्ध होते. असे मानले जाते की ऋषी दुर्वास ज्याच्यावर कोपत असत, त्यांचे नेहमी कल्याण होते.

2) हनुमान अवतार: हनुमान हा भगवान शिवाचा रुद्र अवतार आणि सर्व अवतारांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. भगवान शिव या अवतारात वानराच्या रूपात जन्माला आले आणि त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य रामाच्या भक्तीमध्ये व्यतीत केले. असे मानले जाते की, हनुमान आजही या पृथ्वीवर भ्रमण करतो.

3) वृषभ अवतार: वृषभ अवतार हा भगवान शिवाच्या विशेष परिस्थितीत घेतलेल्या अवतारांपैकी एक आहे, हिंदू पुराणानुसार, या अवतारात भगवान भोलेनाथने भगवान विष्णूच्या अहंकारी पुत्रांचा वध केला.

4) कृष्ण दर्शन अवतार : या अवतारात भगवान शिवाने पृथ्वीवरील यज्ञासारख्या धार्मिक कार्याचे महत्त्व सांगितले. भगवान शिवाचा हा अवतार पूर्णपणे धर्माचे प्रतीक मानला जातो.

5) वीरभद्र अवतार: जेव्हा माता सतीने दक्षाच्या यज्ञकुंडात आपले शरीर दान केले तेव्हा भगवान शिवाने वीरभद्राचा अवतार घेतला. भगवान शिवाच्या या अवताराने राजा दक्षाचा यज्ञ नष्ट केला आणि त्याचा शिरच्छेद करून त्याला मृत्युदंड दिला.

6) भैरव अवतार: शिव महापुराणानुसार, भैरव अवताराचे वर्णन देवाधिदेव महादेव शिवाचे पूर्ण रूप आहे. त्यांचे सर्वात प्रसिद्ध मंदिर काशी येथे आहे

7) अवधूत अवतार: जेव्हा देवतांचा राजा इंद्राचा अहंकार खूप वाढला होता, तेव्हा भगवान शिवाने अवधूत अवतार घेऊन स्वर्गपती देवराज इंद्राचा अहंकार मोडला.

8) सुरेश्वर अवतार: या अवतारात, भगवान शिव, लहान मुलाच्या उपमन्यूच्या भक्तीवर प्रसन्न होऊन, त्याला आपला परम भक्त आणि परम अमर होण्याचे वरदान.

9) अश्वत्थामा अवतार: महाकाव्य महाभारतात असे सांगितले आहे की गुरु द्रोणांचा पुत्र अश्वत्थामा हा काल, क्रोध, यम आणि भगवान शिव यांचा अवतार होता. महाभारत काळातील तो शूर योद्धा आजही जिवंत असल्याचे मानले जाते.

10) शरभावतार: हिंदू पुराणानुसार, या अवतारातील भगवान शिवाचे रूप अर्धे हरीण आणि बाकीचे शरभ पक्षी होते. पुराणात असे म्हटले आहे की, शरभ पक्षी 8 पायांचा प्राणी होता आणि सिंहापेक्षा अधिक शक्तिशाली होता. असे मानले जाते की भगवान शिवाने हा अवतार घेण्याचे कारण भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराचा राग शांत करण्यासाठी होता. इत्यादी...


Comments